संपादक फिरोज खाटीक :- 9284524906
* पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर *
! काळेपडळ पोलीस स्टेशन पुणे शहर !
मा.पोलीस आयुक्त सो. पुणे शहर यांनी पुणे शहर कार्यक्षेत्रातील पोलीस ठाणे हद्दीत अवैध धंदे, अभिलेखांवरील आरोपीत इसम, तडिपार इसम अग्निशस्त्र बाळगणारे गुन्हेगार यांना चेक करण्याबाबत आदेशित केले होते. त्याअनुशंगाने तपास पथकातील अधिकारी व अंमलदार हे काळेपडळ पोलीस ठाणे हद्दीत पेट्रोलींग करीत असताना, पोलीस अंमलदार विशाल ठोंबरे, गिरीराज जगदाळे, अतुल पंधरकर व महादेव शिंदे यांना त्यांचे गोपनिय बातमिदारामार्फत माहिती मिळाली की, रेकॉर्डवरील आरोपी आकाश संतोष भारती, गणेश बबन लोंढे व त्यांचे दोन साथिदार हे हेवन पार्क ते लक्ष्मिपार्ककडे जाणा-या मधल्या कच्च्या रस्त्यावर अंधारात कोणतातरी दखलपात्र गुन्हा करण्याचे उद्देशाने आपले कब्जात काहीतरी संशयित चिजवस्तु जवळ बाळगून थांधलेले आहेत. तरी सदरची संशयित चिजवस्तु हे अग्निशस्त्र असण्याची दाट शक्यता आहे. सदरबाबत तपास पथक अधिकारी सपोनि अमित शेटे, पोलीस उप-निरीक्षक विनायक गुरव यांना कळविले असता, त्यांनी सदरची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक गिरीषा निबाळकर यांना कळविली, त्यांचे मार्गदर्शनाखाली सपोनि अमित शेटे, पोउनि विनायक गुरय व पोलीस स्टाफ असे हेवनपार्क ते लक्ष्मिपार्ककडे जाणा-या रोडलगत असणारे मोकळ्या जागेच्या आडबाजुस संर्व टिमला दिलेल्या सुचनांप्रमाणे जावुन मिळालेल्या माहितीची खात्री केली असता, रेकॉर्डवरील आरोपी नामे आकाश भारती व त्याचा साथिदार दिपक विष्ट यांना शिताफीने ताब्यात घेतले परंतु, अंधाराचा फायदा घेवून गणेश लोंढे तेथून पळून गेला. आकाश भारती व दिपक बिष्ट यांचे अंगझडतीत एक गावठी बनावटीचे पिस्टल, एक अधिकचे मॅगझिन व दोन जिवंत राऊंड दिनांक ०२/०६/२०२६ रोजी जप्ती करण्यात आले होते. पळून गेलेला आरोपी गणेश लोंढे यास गुप्त बातमिदारातुन मिळालेल्या माहितीनुसार दगाई माता फरिस्ट, तरवडे वस्तीमागे, पुणे येथून सापळा रचून दि. ०४/०६/२०२६ रोजी ताब्यात घेतले. त्याचेकडून एक गावठी बनावटीचे पिस्टल, एक अधिकचे मॅगझिन व दोन जिवंत राऊंड जप्त करण्यात आलेले आहेत. तरी कारवाईमध्ये वरील नमुद आरोपींकडून दोन गावठी बनावटीचे पिस्टल, दोन अधिकचे मॅगझिन व चार जिवंत राऊंड असा एकुण १,४४,०००/- रु. किंमतीचा मुद्देमाल मिळुन आलेला आहे. वरील आरोपीत इसम नामे १) आकाश सतोष भारती वय-२७ वर्षे, २) दिपक राम बिस्ट वय-२० वर्षे व वानवडी पोलीस ठाणेकडील तडीपार आरोपीत नामे ०३) गणेश बबन लोंढे, वय २५ वर्षे यांचेवर काळेपडळ पोलीस ठाणे, पुणे गुन्हा रजि.नं. २५०/२०२६, भारतीय हत्यार कायदा कलम ३(२५) व महाराष्ट्र पोलीस कायदा कलम ३७ (१) (३) सह १३५, १४२, बी.एन.एस. कलम ३(५) प्रमाणे गुन्हा दाखल करुन, आरोपीत यांना दाखल गुन्ह्यात अटक करुन, गुन्ह्याचा तपास सहा. पोलीस निरीक्षक अमित शेटे हे करीत आहेत. चालू आहे
सदरची कामगिरी ही जीवन बेनीवाल, पोलीस उप आयुक्त परिमंडळ ६, पुणे शहर, अतुल नवगिरे, सहाय्यक पोलीस आयुक्त, हडपसर विभाग यांचे मार्गदर्शनाखाली गिरीषा निंबाळकर, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, काळेपडळ पोलीस स्टेशन यांचे सुचनेप्रमाणे सहा.पो.निरी. अमित शेटे, पोउनि विनायक गुरव, पोलीस हवालदार प्रविण काळभोर, अमोल फडतरे, दाऊद सय्यद, प्रतिक लाहिगुडे, शाहीद शेख, पोलीस अंमलदार विशाल ठोंबरे, लक्ष्मण काळे, अतुल पंधरकर, नितीन ढोले, सद्दाम तांबोळी, प्रदिप बेडीस्कर, महादेव शिंदे, गिरीराज जगदाळे यांचे पथकाने केली आहे.

मुख्य संपादक : – इमरान शेख


























