Homeक्राईमस्पा चालकाला वेश्या व्यवसायाच्या खोट्या गुन्ह्याची धमकी देत १.५ लाखांची खंडणी.

स्पा चालकाला वेश्या व्यवसायाच्या खोट्या गुन्ह्याची धमकी देत १.५ लाखांची खंडणी.

संपादक फिरोज खाटीक :- 9284524906

* पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर *

! खराडी पोलीस स्टेशन पुणे शहर !

खराडी पोलीस स्टेशन हददीत दि. १३/०५/२०२६ रोजी सायंकाळी १९.०० वा. चे सुमारास सिटी व्हिस्टा बिल्डींग, खराडी येथील इमारतीमध्ये फिल टच स्पा, या स्पामध्ये ०३ अनोळखी पुरुष व ०२ अनोळखी महिला यांनी फिर्यादी यांचे स्पामध्ये जावून फिर्यादी या त्यांच्या ‘स्पामध्ये वेश्या व्यवसाय चालवतात असे फिर्यादी यांना बोलुन दमदाटी व शिवीगाळ करुन फिर्यादीला त्यांचेविरुध्द पोलीस केस करण्याची धमकी देउन फिर्यादींना प्रथम २ लाख रुपयाची खंडणीची मागणी करुन फिर्यादीने त्यास नकार दिल्याने फिर्यादींना हाताने मारहाण करुन तडजोडी अंती १.५ लाख रुपयाची खंडणी ठरवुन त्या रकमेपैकी ३० हजार रुपये फिर्यादीकडुन ऑनलाईन खंडणी स्वरुपात घेवुन फिर्यादीविरुध्द वेश्या व्यवसायाचा खोटा गुन्हा नोंद करण्याची धमकी दिल्याने ०३ अनोळखी पुरुष व ०२ महिलाविरुध्द दिनांक १४/०५/२०२६ रोजी खराडी पोलीस स्टेशन, गुन्हा रजि क्र. १६१/२०२६, भारतीय न्याय संहिता कलम ३०८ (२), ३०८(३).३०८ (७),११५(२), ३ (५) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला.

सदर गुन्हा हा खंडणी स्वरुपाचा असल्याने मा. श्री सोमय मुंडे, पोलीस उप आयुक्त, परिमंडळ ७यांनी श्री संजय चव्हाण, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, खराडी पोलीस स्टेशन यांना सदर गुन्हा तात्काळ उघडकीस आणण्याच्या सुचना दिल्या होत्या. त्यानुसार श्री चंद्रसेन पालकर, पोलीस निरीक्षक (गुन्हे) यांचे मार्गदर्शनाखाली तपास पथकाचे अधिकारी सहायक पोलीस निरीक्षक, श्री रविंद्र गोडसे व पोलीस उप निरीक्षक, श्री राहुल कोळपे यांची सदर गुन्हयातील अनोळखी आरोपींचा शोध घेण्याकरीता दोन तपासी पथके तयार करण्यात आली.

तपास दरम्यान तपास पथक अधिकारी सपोनि रविंद्र गोडसे, पोउनि कोळपे व अंमलदार यांनी गुन्हयाचे घटनास्थळ परिसरातील सीसीटीव्ही पाहणी करुन अनोळखी पुरुष व महिलाचे वर्णन आधारे त्यामधील एका अनोळखी पुरुषाचे ठावठिकाणी माहिती गोपनीय बातमीआधारे प्राप्त करुन गुन्हयातील एक अनोळखी पुरुष आरोपी प्रतिक जयवंत गायकवाड, वय ३१ वर्षे, रा लाडोबा वस्ती, रामदत्त निवास, केसनंद-वाडेगाव रोड, केसनंद यास केसनंद फाटा, वाघोली येथे रात्रीच्या वेळी सापळा रचुन ताब्यात घेतले व त्याचेकडे केलेल्या तपासात आरोपी विशाल साळवे, रा एस. एस. शाळे समोर, विश्रांतवाडी येरवडा पुणे व आरोपी रोहित मांढरे, रा सिध्दीविनायक मित्रमंडळा जवळ, येरवडा पुणे व महिला आरोपी छाया सुखदेव कांबळे, वय ४० वर्षे धंदा सामाजिक कार्यकर्ता राहणार संतोष मिञ मंडळ, लक्ष्मीनगर, येरवडा, पुणे व सुनिता संजय लोंढे, वय ४३ वर्षे धंदा सुरक्षा रक्षक राहणार टेम्पो चौक, संतोष अॅटो गॅरेज शेजारी, वडगाव शेरी, पुणे यांना दिनांक १४/०५/२०२६ रोजी नमुद गुन्हयात अटक करण्यात आली असुन सदर आरोपी यांना मा. न्यायालयाने ०३ दिवस पोलीस कोठडी रिमांड मंजुर केली आहे. गुन्हयाचे तपासात आरोपीकडुन गुन्हयातील मालमत्ता रोख रुपये ३०,००००/- व एक होंडा अॅक्टीव्हा दुचाकी वाहन अशी एकुण किं. रु. ७०,०००/- एवढी मालमत्ता हस्तगत करण्यात आली आहे. पुढील अधिक तपास सहायक पोलीस निरीक्षक श्री रविंद्र गोडसे हे करीत आहेत.

सदरची कामगिरी मा. श्री अमितेशकुमार साो, पोलीस आयुक्त, पुणे शहर, मा. श्री रंजनकुमार शर्मा, पोलीस सह आयुक्त, पुणे शहर, मा. श्री. मनोजकुमार पाटील साो, अपर पोलीस आयुक्त, पुर्व प्रादेशिक विभाग, पुणे शहर, मा. श्री. सोमय मुंडे, पोलीस उप आयुक्त साो, परिमंडळ ७, पुणे शहर, मा.श्रीमती नुतन पवार मॅडम, सहा. पोलीस आयुक्त सो, खराडी विभाग, पुणे शहर, यांचे मार्गदर्शनाखाली श्री. संजय चव्हाण, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, खराडी पोलीस ठाणे, श्री चंद्रसेन पालकर, पोलीस निरीक्षक (गुन्हे), खराडी पोलीस स्टेशन, पुणे शहर, तपास पथकाचे प्रभारी अधिकारी श्री. रविंद्र गोडसे, सहायक पोलीस निरीक्षक, श्री राहुल कोळपे, पोलीस उप निरीक्षक, पोलीस अंमलदार मनोज खरपुडे, महेश नाणेकर, श्रीकांत शेंडे, साहेबराव गुंडाळे, अशोक केदार, श्रीकांत कोद्रे, सुरज जाधव, विलास केदारी यांनी केली आहे.८

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

पिसोळीतील गोडाऊनला लागलेली आग आटोक्यात; अग्निशमन दलाच्या तत्परतेमुळे मोठा अनर्थ टळला!

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * पिसोळीतील गोडाऊनला लागलेली आग आटोक्यात; अग्निशमन दलाच्या तत्परतेमुळे मोठा अनर्थ टळला! ...

पिसोळीतील ARV Imperial सोसायटीत फ्लॅटला भीषण आग; अग्निशमन दलाच्या तत्परतेने मोठा अनर्थ टळला!

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610 * पुणे पोलीस टाइम्स ऑनलाइन पुणे शहर *   पिसोळीतील ARV Imperial सोसायटीत फ्लॅटला भीषण आग; अग्निशमन दलाच्या तत्परतेने मोठा अनर्थ...

देवेंद्र फडणवीस उद्याचा सूर्य पाहणार नाहीत” अशी धमकीवजा कॉल ११२ क्रमांकावर करणाऱ्या इसमाला पुणे...

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610 ! पुणे पोलीस टाईम्स ऑनलाइन पुणे शहर ! * युनिट ५ गुन्हे शाखा पुणे शहर * “देवेंद्र फडणवीस उद्याचा सूर्य पाहणार...

अंमली पदार्थांविरोधात कोंढवा पोलिसांची धडक मोहीम; अवघ्या २ तासांत ६१ जण ताब्यात.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610 सहसंपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! कोंढवा पोलीस पोलीस स्टेशन पुणे शहर ! कोंढवा...

तडीपार आरोपीवर युनिट ५ची धडक कारवाई; वानवडीतून राहुल परदेसी ताब्यात.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610  सहसंपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! गुन्हे शाखा युनिट ५ पुणे शहर ! पुणे...

error: Content is protected !!