संपादक फिरोज खाटीक :- 9284524906
* पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर *
! वानवडी पोलीस स्टेशन पुणे शहर !
दि.२३/१२/२०२५ रोजी वानवडी पोलीस स्टेशन कडील पोलीस आधिकारी व पोलीस अंमलदार हद्दीत पेट्रोलिंग करत असताना पोलीस अंमलदार दया शेगर व अमोल पिलाने यांना गुप्त बाबतमीदारामार्फत बातमी मिळाली की हातभट्टीची गावठी दारु टेम्पोतून वाहतूक होणार आहे सदरची बातमी मिळताच तात्काळ नमुद पोलीस आधिकारी व अंमलदार यांनी नमुद ठिकाणी शोध घेत असताना सदर टेम्पो घोरपडी, पुणे येथे जात असल्याची माहिती मिळाल्याने पोलीस तपास पथकाने नमुद ठिकाणी जाऊन सापळा रचुन नमुद संशयित वाहन ताब्यात घेतले असता त्यामध्ये चार इसम मिळुन आले असता त्यांना त्याचे नाव व पत्ता विचारला असता १) लियाकत रोहीत अब्बासी, वय ३२ वर्षे, रा.स.नं. ६६, ढोबरवाडी, रेल्वे पटरीच्या बाजुला, सोपानबाग, पुणे २) श्रीकांत बापु साबळे, वय २१ वर्षे, रा.सोरतापवाडी फाटा, ऊरळीकांचन, पुणे ३) संकेत विजय वाबळे, वय १९ वर्षे, रा. हेल्पर, रा. सदर व ४) विशाल दुर्योधन संगोडिया, वय १८ वर्षे, रा. गाडामुडी गाव, खामगाव फाटाजवळ, यवत, पुणे असे सांगितले. सदर आरोपीकडे आधिक तपास केला असता आरोपी क्र .०१ याने पुणे शहरात गावठी हातभट्टी दारु मिळत नसल्यामुळे ती यवत येथुन आरोपी क्र.०४ यांचे वडिलांककडुन तयार हातभट्टी गावठी दारुचे कॅन्ड विकत घेऊन सदर टेम्पोमध्ये भरले असल्याचे कबुल केले. सदर आरोपीच्या ताब्यातील टेम्पोची तपासणी केली असता त्यामध्ये प्लास्टीकचे ३५ लिटरचे दारुने भरलेले एकुण ३३ हत्ती कॅन्ड असे एकुण १,१५० लिटर गावठी हातभट्टीची दारु व त्याची वाहतुक करणेकामी वापरलेला टेम्पो त्याचा असा एकुण ५,६५,५००/- रु. कि.चा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. वानवडी पोलीस स्टेशन येथे गु.र.नं. ५२० / २०२५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असुन अधिक तपास पोलीस उप निरीक्षक अल्फाज शेख हे करीत आहे.
सदरची कारवाई ही मा. पोलीस उप-आयुक्त, परिमंडळ ०५ पुणे शहर श्रीमती राजलक्ष्मी शिवणकर, सहा.पोलीस आयुक्त, वानवडी विभाग, पुणे शहर श्रीमती नम्रता देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली मा. वरिष्ठ पोलीस निरीक्षक वानवडी पो. स्टे. पुणे शहर श्री. भाऊसाहेब पाटील, पोलीस निरीक्षक (गुन्हे) श्रीमती संगीता जाधव यांचे सुचनेप्रमाणे तपास पथकाचे सहा. पोलीस निरीक्षक, उमाकांत महाडिक, पोलीस उपनिरीक्षक अल्फाज शेख, पोलीस अंमलदार दया शेगर, महेश गाढवे, अमोल पिलाणे, अतुल गायकवाड, आशिष कांबळे, अमोल गायकवाड, गोपाळ मदने, विष्णु सुतार, अभिजित चव्हाण, बालाजी वाघमारे, विठ्ठल चोरमले व अर्षद सय्यद, या पथकाने केली .

मुख्य संपादक : – इमरान शेख


























