Homeक्राईमवानवडी पोलिसांची मोठी कारवाई : BSNL कॉपर केबल चोरी करणारी आंतरराज्यीय टोळी...

वानवडी पोलिसांची मोठी कारवाई : BSNL कॉपर केबल चोरी करणारी आंतरराज्यीय टोळी जेरबंद, ८० लाखांचा मुद्देमाल जप्त.

संपादक फिरोज खाटीक :- 9284524906

* पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर *

! वानवडी पोलीस स्टेशन, पुणे शहर !

दिनांक ०८/०५/२०२६ रोजी २३/०० वा ते दि.०९/०५/२०२६ रोजी ०३/०० वा चे पर्यंत कोंबिग ऑपरेशन दरम्यान वानवडी पोलीस स्टेशन तपास पथकातील पोलीस उप-निरीक्षक अल्फाज शेख व तपास पथकातील पोलीस अंमलदार हे पोलीस स्टेशन हद्दीतील रेकॉर्डवरील आरोपी चेक करीत असताना पोलीस अंमलदार अर्शद सय्यद व गोपाळ मदने यांना त्यांचे बोपनीय बातमीदारामार्फत बातमी मिळाली की, हनीवेल कंपनीजवळ, आश्रय चहा हॉटेलसमोर हडपसर इंडस्ट्रीयल एरिया हडपसर पुणे येथे काही इसम हे संशयितरित्या ड्रेनेज पाईपलाईनचे झाकन काढुन त्यामधील कॉपरीची केबल वायर क्रेनच्या साहाय्याने ओदुन बाहेर काढत असुन त्याचे तुकडे करुन एका आयशर ट्रकमध्ये टाकत आहेत. सदर बातमी पोलीस उप-निरीक्षक अल्फाज शेख यांनी तात्काळ वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांना कळवली असता त्यांनी सदर ठिकाणी जावुन खात्री करुन कायदेशीर कारवाई करणेबाबत आदेशित केले.

सदर बातमीच्या अनुषंगाने पोलीस उप-निरीक्षक अल्फाज शेख व तपास पथकातील पोलीस अंमलदार यांनी सदर ठिकाणी जावुन तपास केला असता काही इसम हे ड्रेनेज पाईपलाईन मधुन कॉपरीची केबल वायर क्रेनच्या साहाय्याने ओढुन बाहेर काढुन चोरी करताना मिळुन आले. सदर इसमांना ताब्यात घेवुन त्यांना नाव पत्ता विचारले असता त्यांनी त्यांची नावे १) अस्लम सगीर खान, वय ३९ वर्षे रा. तिलकनगर, वेस्ट दिल्ली २) आरिफ बुंन्दुखाँ खान, वय ४० वर्षे रा. उत्तरप्रदेश ३) शोहेब हारुण खान वय २५ वर्षे रा. उत्तरप्रदेश ४) सलमान इद्रीस मलीक वय ३३ वर्षे रा. दिल्ली ५) नरेश कुमार श्रीशिवचरण वय ४३ वर्षे रा. हरियाणा ६) नवी मोहम्मद शान मोहम्मद वय ३५ वर्षे रा. उत्तरप्रदेश, ७) अनिस अन्सारी मोहम्मद गियासुद्दीन वय २२ वर्षे, रा. हडपसर पुणे ८) अफाक अन्सारी रफिक अन्सारी वय २२ वर्षे रा. हडपसर पुणे ९) प्रविण दादासाहेब बागुल वय ३३ वर्षे रा.एस. आर.ए. कॉलनी, शिंदेवस्ती, हडपसर, पुणे असे असल्याचे सांगितले. सदर आरोपरींना अटक करुन नमुद आरोपींविरुध्द वानवडी पोलीस स्टेशन येथे गु.र.नं.२०८/२०२६ भा.न्या.सं.क. ३०३ (२),६०,३ (५) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर गुन्हयाचा पुढील तपास पोलीस उप-निरी. अल्फाज शेख करीत आहेत.

सदर आरोपीकडुन ३४,८०,०००/-रु. किं.ची कॉपर वायर, वायर काढण्यासाठी वापरलेली क्रेन, आयशर ट्रक व मोपेड गाडी असा एकुण ८०,७०,०००/-रु.किं.चा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

सदरची कामगिरी ही मा. अपर पोलीस आयुक्त पुर्व प्रादेशिक विभाग पुणे शहर श्री. मनोज पाटील, मा. पोलीस उप-आयुक्त परिमंडळ ०५ पुणे शहर श्रीमती राजलक्ष्मी शिवणकर, मा. सहा. पोलीस आयुक्त वानवडी विभाग, पुणे शहर श्रीमती नम्रता देसाई यांचे मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक वानवडी पोलीस स्टेशन पुणे शहर श्री. भाऊसाहेब पाटील, पोलीस निरीक्षक (गुन्हे) श्रीमती संगीता जाधव यांचे सुचनांप्रमाणे तपास पथकाचे सहा. पोलीस निरीक्षक उमाकांत महाडिक, पोलीस उप-निरीक्षक अल्फाज शेख, पोलीस उप-निरीक्षक शशीकांत लोंढे, पोलीस अंमलदार अमोल पिलाणे, महेश गाढवे, दया शेगर, गोपाळ मदने, अर्षद सय्यद, अभिजित चव्हाण, सर्फराज देशमुख, अमोल गायकवाड, विठ्ठल चोरमले, आशिष कांबळे, विष्णू सुतार, बालाजी वाघमारे, गणेश भुजबळ, वैभव निकम व हडपसर पोलीस स्टेशनकडील पोलीस अंमलदार बापू लोणकर व महावीर लोंढे यांचे पथकाने केली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

पिसोळीतील गोडाऊनला लागलेली आग आटोक्यात; अग्निशमन दलाच्या तत्परतेमुळे मोठा अनर्थ टळला!

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * पिसोळीतील गोडाऊनला लागलेली आग आटोक्यात; अग्निशमन दलाच्या तत्परतेमुळे मोठा अनर्थ टळला! ...

पिसोळीतील ARV Imperial सोसायटीत फ्लॅटला भीषण आग; अग्निशमन दलाच्या तत्परतेने मोठा अनर्थ टळला!

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610 * पुणे पोलीस टाइम्स ऑनलाइन पुणे शहर *   पिसोळीतील ARV Imperial सोसायटीत फ्लॅटला भीषण आग; अग्निशमन दलाच्या तत्परतेने मोठा अनर्थ...

देवेंद्र फडणवीस उद्याचा सूर्य पाहणार नाहीत” अशी धमकीवजा कॉल ११२ क्रमांकावर करणाऱ्या इसमाला पुणे...

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610 ! पुणे पोलीस टाईम्स ऑनलाइन पुणे शहर ! * युनिट ५ गुन्हे शाखा पुणे शहर * “देवेंद्र फडणवीस उद्याचा सूर्य पाहणार...

अंमली पदार्थांविरोधात कोंढवा पोलिसांची धडक मोहीम; अवघ्या २ तासांत ६१ जण ताब्यात.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610 सहसंपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! कोंढवा पोलीस पोलीस स्टेशन पुणे शहर ! कोंढवा...

तडीपार आरोपीवर युनिट ५ची धडक कारवाई; वानवडीतून राहुल परदेसी ताब्यात.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610  सहसंपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! गुन्हे शाखा युनिट ५ पुणे शहर ! पुणे...

error: Content is protected !!