मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610
! पुणे पोलीस टाईम्स ऑनलाइन पुणे शहर !
* युनिट ५ गुन्हे शाखा पुणे शहर *
“देवेंद्र फडणवीस उद्याचा सूर्य पाहणार नाहीत” अशी धमकीवजा कॉल ११२ क्रमांकावर करणाऱ्या इसमाला पुणे पोलिसांनी सोलापूर ग्रामीणमधून ताब्यात घेतले आहे.
दि. १३ सप्टेंबर २०२६ रोजी रात्री सुमारे ११ वाजून १० मिनिटांनी, एका मोबाईल क्रमांकावरून ११२ नियंत्रण कक्षाला हा धमकीवजा कॉल करण्यात आला होता.
या घटनेची गांभीर्याने दखल घेत पुणे पोलिसांनी संबंधित मोबाईल क्रमांकाचे तांत्रिक विश्लेषण केले. तपासादरम्यान संबंधित इसमाचे नाव भीमाशंक शरणाप्पा फुलारे, रा. हडपसर, पुणे, असल्याचे समोर आले.
पोलिसांनी त्याच्या मोबाईल लोकेशनचा तपास केला असता तो सोलापूर ग्रामीणमधील कामती पोलीस ठाण्याच्या हद्दीत असल्याचे निष्पन्न झाले.
यानंतर गुन्हे शाखा युनिट ५ चे पोलीस निरीक्षक संदीपान पवार यांनी कामती पोलीस ठाण्याशी संपर्क साधून संबंधित इसमाला ताब्यात घेण्याच्या सूचना दिल्या. पुणे नियंत्रण कक्षाकडूनही सोलापूर ग्रामीण नियंत्रण कक्षाला याबाबत माहिती देण्यात आली.
त्यानुसार कामती पोलीस ठाण्याच्या पथकाने भीमाशंक फुलारे याला ताब्यात घेतले.
त्यानंतर वरिष्ठांच्या आदेशानुसार, सहायक पोलीस निरीक्षक पठाण, ADS-2 गुन्हे शाखा आणि पथकाने दि. १४ सप्टेंबर रोजी सायंकाळी ४ वाजून २० मिनिटांनी कामती पोलीस ठाण्यातून संबंधित इसमाला ताब्यात घेऊन पुण्यात आणले.
वैद्यकीय तपासणी केल्यानंतर पुढील कायदेशीर कारवाईसाठी त्याला संबंधित अधिकाऱ्यांच्या ताब्यात देण्यात आले आहे.
या प्रकरणाचा पुढील तपास पुणे पोलिसांकडून सुरू आहे.

मुख्य संपादक : – इमरान शेख


























