संपादक फिरोज खाटीक :- 9284524906
* पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर *
! वारजे माळवाडी पोलीस स्टेशन, पुणे शहर !
वारजे माळवाडी पोलीस स्टेशन येथील फिर्यादी यांना गे डेटींग अॅण्ड चॅट या अॅपद्वारे चॅटिंग करून बोलावून घेवून त्याला मारहाण करून मोबाईलद्वारे जबरदस्तीने पैसे ट्रान्सफर केले व त्याची चांदीची चैन हिसकावून घेतल्यामुळे फिर्यादी यांच्या तक्रारीवरून वारजे माळवाडी पोलीस स्टेशन येथे दि.०८/०५/२०२६ रोजी गु.र.नं. १५३/२०२६, भा.न्या.सं.क. ३०९ (६), ३५२, ३५१ (२), ३ (५) अन्वये चार अनोळखी इसमांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला होता. दाखल गुन्हा हा गंभीर स्वरूपाचा असल्याने वरिष्ठ पोलीस निरीक्षक वारजे माळवाडी पोलीस स्टेशन श्री. महेश बोळकोटगी यांनी तात्काळ तपास पथकाचे प्रभारी पोलीस उप-निरीक्षक संजय नरळे यांना त्यांचे पोलीस स्टाफ सह आरोपीचा शोध घेण्याबाबत आदेश दिले होते. तपास पथकाचे प्रभारी पोलीस उप-निरीक्षक संजय नरळे यांनी फिर्यादी यांच्याशी बोलून आरोपींच्याबाबत माहिती घेवून आरोपींच्या मोबाईलचे तांत्रिक विश्लेषण केले. तसेच पोलीस अंमलदार बालाजी काटे व महादेव शिंदे यांना त्यांच्या गोपनिय बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, सदरची जबरी चोरी करणा-या इसमांपैकी एक इसम हा अतुलनगर चौकामध्ये थांबलेला आहे. सदरची माहिती प्राप्त होताच पोलीस उप-निरीक्षक व पोलीस अंमलदार असे नमुद ठिकाणी जावुन पाहणी करून तेथून एका आरोपीला ताब्यात घेतले. त्यास त्याचे नाव पत्ता विचारता त्याने त्याचे नाव ओम गणेश वाघमारे वय २० वर्षे रा.स.नं.७२, चिंतामणी सोसायटीच्या मागे वारजे माळवाडी पुणे असे सांगितले. त्याचेकडे अधिक चौकशी केली असता त्याने सदर गुन्हा केल्याचे कबूल केले. त्यास दाखल गुन्हयात अटक करण्यात आली असून त्याच्या आणखी एका अल्पवयीन साथीदारालासुध्दा ताब्यात घेण्यात आले आहे. दाखल गुन्हयाचा पुढील तपास पोलीस उप-निरीक्षक शंकर पाटील, वारजे माळवाडी पोलीस स्टेशन, पुणे शहर हे करीत आहेत.
सदरची कारवाई ही मा.अपर पोलीस आयुक्त, पश्चिम प्रादेशिक विभाग, पुणे शहर श्री. राजेश बनसोडे, मा. पोलीस उप-आयुक्त, परिमंडळ ३ पुणे शहर श्री. संभाजी कदम, मा. सहा. पोलीस आयुक्त, कोथरुड विभाग, पुणे शहर श्रीमती सुजाता तानवडे यांचे मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक, वारजे गाळवाडी पोलीस स्टेशन श्री. महेश बोळकोटगी, पोलीस निरीक्षक (गुन्हे) श्री. प्रकाश धेंडे, यांचे सुचनांप्रमाणे पोलीस उप-निरीक्षक संजय नरळे, पोलीस अंमलदार बालाजी काटे, शरद पोळ, निखील तांगडे, अमित जाधव, अमित शेलार, सत्यजित लोंढे, गणेश शिंदे व महादेव शिंदे यांनी केलेली आहे.

मुख्य संपादक : – इमरान शेख


























