Homeक्राईमकोंढवा पोलिसांच्या भक्कम तपासाला यश ; घरफोडी व चोरी प्रकरणातील आरोपीला १...

कोंढवा पोलिसांच्या भक्कम तपासाला यश ; घरफोडी व चोरी प्रकरणातील आरोपीला १ वर्ष कारावास.

संपादक फिरोज खाटीक :- 9284524906

* पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर *

! कोंढवा पोलीस स्टेशन पुणे शहर !

१) दिनांक ०३/०५/२०२४ रोजी यातील फिर्यादी हे त्यांचे घरास कुलुप लावुन हांडेवाडी येथे गेले कोणीतरी अज्ञात इसमाने घराचे कुलूप तोडुन ५,०००/-रु. रोख रक्कम व ७,०००/-रु.किं. चा कॅनन कंपनीचा काळया रंगाचा कॅमेरा चोरुन नेलेबाबत दिनांक ०५/०३/२०२४ रोजी कोंढवा पोलीस स्टेशन येथे गु.र.नं.२४२/२०२४ भा.द.वि.क.४५४,३८० प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता. सदर गुन्हयाचा तपास पोलीस अंमलदार राजेंद्र खामकर यांनी करुन आरोपी निष्पन्न करुन गुन्हयाचा तपास पुर्ण करुन आरोपी नामे महेश उर्फ महया काशिनाथ चव्हाण वय २० वर्षे रा. गाडीतळ हडपसर पुणे यांचेविरुध्द मा. न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले.

२) दिनांक १७/०५/२०२४ रोजी १७/०० वाचे दरम्यान सोमजी चौक येथील डिसेंट सप्लायर हार्डवेअर दुकानाच्या समोरुन यातील फिर्यादी यांनी पार्क केलेली एम.एच.१२ क्यु के ७३२५ सुझुकी कंपनीची अॅक्सेस दुचाकी गाडी कोणीतरी अज्ञात इसमाने चोरुन नेली म्हणुन दिनांक २२/०५/२०२४ रोजी कोंढवा पोलीस स्टेशन येथे गु.र.नं.५७५/२०२४ भा.द.वि.क. ३७९ प्रमाणे अज्ञात इसमाविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला होता. सदर गुन्हयाचा तपास पोलीस अंमलदार अरुण किटे यांनी करुन आरोपी निष्पन्न करुन गुन्हयाचा तपास पुर्ण करुन आरोपी नामे महेश उर्फ महया काशिनाथ चव्हाण वय २० वर्षे रा. गाडीतळ हडपसर पुणे यांचेविरुध्द मा. न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले.

३) दिनांक ०८/०८/२०२४ रोजी २२/३० वा. यातील फिर्यादी हे त्यांचे मेडीकल बंद करुन घरी गेले असता दि.०९/०८/२०२४ रोजी पहाटे ०३/०० वा. कोणीतरी अज्ञात इसमाने चोरी करण्याच्या उद्देशाने मेडीकलच्या शटरचे लॉक तोडले म्हणुन दि.०९/०८/२०२४ रोजी कोंढवा पोलीस स्टेशन येथे गु.र.नं.९५४/२०२४ भा.न्या.सं.क.३०५,३३१ (४) प्रमाणे अज्ञात इसमाविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला होता. सदर गुन्हयाचा तपास पोलीस अंमलदार विशाल मेमाणे यांनी करुन आरोपी निष्पन्न करुन गुन्हयाचा तपास पूर्ण करुन आरोपी नामे महेश उर्फ महया काशिनाथ चव्हाण वय २० वर्षे रा. गाडीतळ हडपसर पुणे यांचेविरुध्द मा. न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले.

सदर प्रकरणी मा.श्री.अ.अ. कुलकर्णी प्रथमवर्ग न्यायाधीश, लष्कर न्यायालय पुणे यांचे न्यायालयात सरकारी अभियोक्ता श्रीमती आम्रपाली कस्तुरे यांनी सरकारी पक्षातर्फे कायदेशीर बाजु मांडुन तसेच मा. पोलीस उप-आयुक्त परि.५ श्रीमती राजलक्ष्मी शिवणकर, मा. सहा. पोलीस आयुक्त, वानवडी विभाग श्रीमती नम्रता देसाई, वरिष्ठ पोलीस निरीक्षक कोंढवा पोलीस स्टेशन श्री. कुमार घाडगे, पोलीस निरीक्षक गुन्हे श्री. नवनाथ जगताप यांचे सुचनेप्रमाणे कोर्ट पैरवी पोलीस अंमलदार माऊली गिरमकर व विनय गायकवाड यांनी गुन्हयातील साक्षीदार तसेच पुरावे मा. न्यायालयात सादर केले. सदर प्रकरणी मा.श्री.अ.अ. कुलकर्णी प्रथमवर्ग न्यायाधीश, लष्कर न्यायालय पुणे यांनी वरील तीनही गुन्हयात आरोपी नामे महेश उर्फ महया काशिनाथ चव्हाण वय २० वर्षे रा. गाडीतळ हडपसर पुणे यास १ वर्षे कारवास व १,०००/-रु.दंड व दंड न भरल्यास १ महिने कारावास अशी शिक्षा सुनावली आहे.

सदर गुन्हयांचे दोषसिध्दीचे कामकाज मा. पोलीस उप-आयुक्त परि.५ श्रीमती राजलक्ष्मी शिवणकर, मा. सहा. पोलीस आयुक्त, वानवडी विभाग श्रीमती नम्रता देसाई, वरिष्ठ पोलीस निरीक्षक कोंढवा पोलीस स्टेशन श्री. कुमार घाडगे, पोलीस निरीक्षक गुन्हे श्री. नवनाथ जगताप यांचे सुचनेप्रमाणे कोर्ट पैरवी पोलीस अंमलदार माऊली गिरमकर व विनय गायकवाड यांनी केली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

पिसोळीतील गोडाऊनला लागलेली आग आटोक्यात; अग्निशमन दलाच्या तत्परतेमुळे मोठा अनर्थ टळला!

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * पिसोळीतील गोडाऊनला लागलेली आग आटोक्यात; अग्निशमन दलाच्या तत्परतेमुळे मोठा अनर्थ टळला! ...

पिसोळीतील ARV Imperial सोसायटीत फ्लॅटला भीषण आग; अग्निशमन दलाच्या तत्परतेने मोठा अनर्थ टळला!

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610 * पुणे पोलीस टाइम्स ऑनलाइन पुणे शहर *   पिसोळीतील ARV Imperial सोसायटीत फ्लॅटला भीषण आग; अग्निशमन दलाच्या तत्परतेने मोठा अनर्थ...

देवेंद्र फडणवीस उद्याचा सूर्य पाहणार नाहीत” अशी धमकीवजा कॉल ११२ क्रमांकावर करणाऱ्या इसमाला पुणे...

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610 ! पुणे पोलीस टाईम्स ऑनलाइन पुणे शहर ! * युनिट ५ गुन्हे शाखा पुणे शहर * “देवेंद्र फडणवीस उद्याचा सूर्य पाहणार...

अंमली पदार्थांविरोधात कोंढवा पोलिसांची धडक मोहीम; अवघ्या २ तासांत ६१ जण ताब्यात.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610 सहसंपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! कोंढवा पोलीस पोलीस स्टेशन पुणे शहर ! कोंढवा...

तडीपार आरोपीवर युनिट ५ची धडक कारवाई; वानवडीतून राहुल परदेसी ताब्यात.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610  सहसंपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! गुन्हे शाखा युनिट ५ पुणे शहर ! पुणे...

error: Content is protected !!